Google AdSense म्हणजे काय ?
आपण Google AdSense हे नाव बऱ्याच वेळा ऐकले असेल. आपण ब्लॉगिंग करतो किंव्हा कोणते ऑनलाईन काम करत असताना आपल्या मनात "पैसे मिळतील" ह्या विचाराने आपण ब्लॉगगिन करत असतो, ऑनलाईन पैसे कमवणे फार काही कठीण नाही. बरेच लोक इंटरनेट च्या साहायाने पैसे मिळवत आहेत. पण याचा अर्थ असा नाही आपण ब्लॉग सुरु केला आणि पैसे मिळवू लागलो. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात तेव्हा कुठे आपल्याला पैसे मिळतात. ब्लॉगिंग गंभीर मानाने केली तर नक्कीच आपण २०-२५ हजार मिळवू शकतो | Google Adsense for Marathi Websites | Google AdSense मराठी मधील ब्लॉग वेबसाईट सुद्धा आता approve करतात म्हणून मराठी ब्लॉगर्स ला खूप सोयीस्कर एक मार्ग उपलब्द झाला आहे.
आपण ब्लॉग बनवल्या नंतर ऍडसेन्स ला नोंदणी करावी लागते, ऍडसेन्स हे एक प्रमुख advertising company आहे गूगलची, अनेक मोठे मोठे ब्लॉगर्स ऍडसेन्स च्या मदतीने महिन्याचे २-३ लाख पैसे मिळवत आहेत. आणि आपण ह्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत कसे ऍडसेन्स मार्फत पैसे मिळवता येतील.
AdSense एक Google चे product आहे जे publisher च्या website किंवा blog मध्ये automatic text, image आणि video अश्या पद्धतीचे ads दाखवतात, बरेच ब्लॉगर्स AdSense वर ब्लॉग नोंदणी करतात आणि जेंव्हा blog AdSense approved होतो तेव्हा त्यांना ads ब्लॉग वर दाखवण्याच्या परवानग्या मिळतात आणि त्या जाहिराती ब्लॉगच्या पैसे कमवण्याचा मुख स्रोत होतो.
Impressions: याच्यामुळे आपल्याला आपल्या जाहिराती कितीवेळा पाहिलं गेले आहे त्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळतात. जसे 1000 view वर $1 मिळते.
Clicks: म्हणजे आपल्या जाहिरातींवर किती वेळा clicks झाले हे दर्शवते.
गुगल ऍडसेन्स अकाऊंट उघडण्याचा सर्वात सोपा मार्ग
आपले Adsense खाते एकदा सुरु झालेकी आपण आपल्या आपल्या मनासारखे जाहितरिना डिसाईन देऊ शकतो आणि आपण ठरवू शकतो जाहिराती ब्लॉग वर कुठे दाखवल्या पाहिजे. जेंव्हा वाचक आपल्या ब्लॉग वर येऊन लेख पोस्ट वाचेल आणि त्यावर असलेल्या जाहिरातीला क्लिक करून प्रतिसाद दिला तर त्या क्लिक चे पैसे तुम्हाला ऍडसेन्स च्या जाहिराती मार्फत मिळतील. Adsense चा एक निकष असा आहे कि जेव्हा $100 वर तुमची कमाई झाली तर तुम्हाला ते पैसे तुमच्या बँक च्या अकाऊंट वर ट्रान्सफर करता येते.
AdSense हे केवळ ब्लॉग वर नाही तर YouTube यूट्यूब सुद्धा काम करते. बरेच वाचक वर्ग आता यूट्यूब YouTube कडे वळू लागला आहे. त्यामुळे यूट्यूब च्या मार्गे बरेच यूटुबर पैसे कमवत आहेत. पण त्यावर जाहिराती ह्या Google AdSense च्याच असतात.
डोमेन व होस्टिंग कशी निवडावी ? | Domain Name for Blog
AdSense कसे काम करते ?
ब्लॉगर्स आपल्या साईट वर ads टाकतात त्यांना publisher म्हणून संबोधले जाते. आणि ज्यांची जाहिरात आपल्याला दिसते त्याला advertiser म्हणतात, जसे आपल्या ब्लॉग वर फेसबुक ची जाहिरात आली तर याच्या अर्थ advertiser हे फेसबुक आहे.
या जाहिराती keyword च्या आधारे आपल्या ब्लॉग वर दाखवल्या जातात, जसे keyword साम्य असलेल्या जाहिराती आपल्या ब्लॉग वर दाखवल्या जातात कारण आपला जो वाचक वर्ग आहे तो त्या keyword च्या लेखाला वाचण्यासाठी आलेला असतो. म्हणून आपण ब्लॉग लिहताना keyword चा यौग्य वापर केला पाहिजे, या विषयी मी एक पोस्ट केली आहे आल्याला नक्की आवडेल पुढील लिंक वर पोस्ट मिळेल.
ब्लॉग कसा तयार करावा ? | How To Create Marathi Blog
वरील पोस्ट मध्ये आपल्याला Google AdSense कसे काम या बद्दलची माहिती आहे या संबंधित आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास खालील दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये comment करून प्रश्न विचारू शकता.
द मराठी ब्लॉग हा ब्लॉग नोव्हेंबर २०१९ च्या ५ तारखेला सुरु केला म्हणजे डोमेन ची नोंदणी केली आणि ऍडसेन्स ला नोंदणी केली १३ नोव्हेंबर ला तरी सुद्धा हा ब्लॉग गूगल ने मान्य केला. कसा? हे येणाऱ्या पोस्ट मध्ये लिहणार आहे.
