गुगल ऍडसेन्स अकाऊंट उघडण्याचा सर्वात सोपा मार्ग

0



 
सध्या आपल्यासाठी बरेच पर्याय उपलब्द आहेत आपल्या ब्लॉगला मोनेटीझशन करण्यासाठी, एखादी बातमी पोर्टल किंव्हा साधारण ब्लॉग या मध्ये सर्वात जास्त नावाजलेले मोनेटीझशन प्लॅटफॉर्म म्हणजे गुगल ऍडसेन्स Google Ad-sense in Marathi. आता पर्यन्तचे , भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय मोनेटीझशन प्लॅटफॉर्म म्हणून गुगल ऍडसेन्स ला प्राधान्य देण्यात येते, कारण गुगल चे पेआऊट म्हणजेच पेमेंट खूप ब्लॉगजर्ससाठी उत्तम आहे. केवळ एवढेच न्हवे तर इतर ऍड पब्लिशर पेक्षा गूगल चे ऍडसेन्स प्रोग्रॅम खूप मोठ्या स्तरावर आहे. अनेक परदेशी ब्लॉगर्स आणि स्थानिक ब्लॉगर यांनी यशस्वी होऊन सिद्ध केले आहे , त्यांना अ‍ॅडसेन्सच्या प्रकाशक प्रोग्रॅम मधून अगदी दरमहा लाखो डॉलर्स कमाई मिळवणे सोपे झाले. परंतु हे आपल्याला मोहक वाटत असेल तर Google अ‍ॅडसेन्ससाठी ब्लॉग कसा तयार करावा हे आपल्याला माहित असले पाहिजे जेणेकरून आपला ब्लॉग प्रकाशक म्हणून स्वीकारला जाईल.


1. ब्लॉग प्लॅटफॉर्म निवडणे

wordpress vs blogger 

बरेच ब्लॉगर आपणास Google ब्लॉगद्वारे ब्लॉग स्थापित करताना दिसतात आणि ते सुद्धा यशस्वीरित्या अ‍ॅडसेन्स वर घेतात पण आपल्याला त्यात आवड असेल तर मी तुम्हाला ब्लॉगस्पॉट वापरण्याचा सल्ला देतो. याचे कारण असे आहे कि ब्लॉगस्पॉट ही Google ची ब्लॉगिंग सेवा आहे, म्हणून ब्लॉगस्पॉट वापरुन तयार केलेले ब्लॉग इतर ब्लॉग सेवांच्या तुलनेत Google कडून अधिक लक्ष वेधून घेतील आणि ऍडसेन्स चे त्यात एक टॅब सुद्धा आहे त्यामुळे ऍडसेन्स हाताळणे सोपे होते. आणि मुख्य म्हणजे हि सुविधा मोफत आहे. त्याच प्रमाणे वर्डप्रेस हे खूप कुशल आणि जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे ज्यात आपल्याला बरेच मनाप्रमाणे बदल करता येतात आणि द मराठी ब्लॉग हा ब्लॉग सुद्धा वर्डप्रेस वर बनवलेला आहे प्रत्येक गोस्ट या ब्लॉग मधील कस्टमाइज्ड आहे जेणे करून आपण उत्तम दर्जेदार दिसण्यास सुंदर अशी डिसाईन या वर्डप्रेस प्लॅटफॉर्म मध्ये बनवू शकतो एसईओ सुद्धा खूप योग्य काम करते. परंतु वर्डप्रेससाठी आपणास डोमेन आणि होस्टिंग विकत घ्यावी लागते.

२. Google Adsense गुगल ऍडसेन्स धोरणाचे अनुपालन करणारे असे डोमेन नाव निवडा

गुगल ऍडसेन्स 

आपण तयार करणारा ब्लॉग, गुगल अ‍ॅडसेन्स नोंदणीसाठी तयार करणार आहोत म्हणजे एक चांगले ब्लॉग डोमेन नाव निवडणे गरजेचे आहे आणि Google अ‍ॅडसेन्स धोरणानुसार, गूगल अ‍ॅडसेन्सवर ब्लॉग नोंदवण्यासाठी गुगल अ‍ॅडसेन्स धोरणाचे उल्लंघन करणारे नाव न वापरण्याची शिफारस केली जाते, म्हणजे बेकायदेशीर औषधे, क्रॅकिंग तंत्र आणि हॅकिंग, अश्लील साहित्य आणि इतर अश्लील शब्दांशी संबंधित नावे वापरणे टाळा एक चांगले आणि योग्य डोमेन नाव वापरुन, आपल्या ब्लॉगला Google अ‍ॅडसेन्सद्वारे स्वीकारण्याची उत्तम संधी आहे

3. ब्लॉग विषय निश्चित करा

Blog Topic Marathi | गुगल ऍडसेन्स 

ब्लॉग चा विषय ठरविताना बहुतेकदा ब्लॉगर्स गोंधळतात सापडतात, ब्लॉग चा विषय खूप महत्वाची गोस्ट आहे ,आपल्याला हे माहित असले पाहिजे की आपण ठराविक विषयाचा ब्लॉग्ज किंवा संपूर्ण विषय मिश्रण ब्लॉग बनवत आहोत पण या पैकी कोणताही प्रकारचा ब्लॉग आपण सुरु केला तरी चालेल, Google Adsense मध्ये स्वीकारला जाईल केवळ Google Adsense च्या धोरणांचे उल्लंघन करत नाही ना हे मात्र आपल्या बारीक नजरेने पहिले पाहिजे. गूगल अ‍ॅडसेन्ससाठी योग्य असे काही विषय - तंत्रज्ञान, आरोग्य, पर्यटन, ब्लॉगिंग, ऑनलाईन व्यवसाय, करमणूक, सौंदर्य.

4. दर्जेदार लिखाण आणि सुंदर रूपाने ब्लॉग्ज भरणे

Google Adsense in Marathi

हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला Google अ‍ॅडसेन्समध्ये स्वीकारला जाण्यासाठी करणे खूप गरजेचे आहे जो उत्तम प्रकारची गुणवत्ता असलेले लेख तयार करणे आणि अर्थातच हि मूळ सामग्री आहे ब्लॉगसाठी. ब्लॉगवर कॉपी पेस्ट लेख प्रकाशित करू नका कारण असे केल्यास आपला ब्लॉग स्वीकारणे शक्य होणार नाही आणि आपली केलेली मेहनत एका चुकी मुळे ऍडसेन्स वर परिणाम होईल आणि स्वीकार होणार नाही. आपला ब्लॉग आकर्शक आणि वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी 1000 शब्दांचा लेख प्रकाशित करण्याचा प्रयन्त करा कारण Google नेहमी 1000 शब्द किंवा अधिक लेखांनी भरलेल्या ब्लॉगसह उत्कृष्ट मूल्य प्रदान करते, कारण ते माहितीपूर्ण मानले जाते.

५ . ब्लॉगचे वय लक्षात घ्या

Google Adsense in Marathi 

गुगल अ‍ॅडसेन्सवर ( Google Adsense in Marathi ) ब्लॉग नोंदणी करण्यासाठी कधीही घाई करू नका, ब्लॉगचे वय 3 महिन्यांपेक्षा कमी असेल तर आपण गुगल अ‍ॅडसेन्सवर ब्लॉग नोंदणी प्रयत्न करू नका. आपल्याला धीर धरावा लागेल आपला ब्लॉग किमान 3 महिने किंवा त्याहून कालावधी पासून कार्यरत असेल तर ब्लॉगिंगच्या सुरूवातीस उत्पन्नावर लक्ष केंद्रित करू नका परंतु आपण प्रकाशित केलेल्या सामग्रीवर लक्ष केंद्रित करा. ब्लॉग वर दर्जेदार लेखन करा गुगल ऍडसेन्स ( Google Adsense in Marathi ) वर ब्लॉग स्वीकारण्याची शक्यता जास्त होते.

वरील पाच मार्गांचे योग्य प्रमाणे पालन केले तर नक्कीच आपला ब्लॉग गुगल ऍडसेन्स वर येईल आणि आपल्याला ब्लॉग च्या आधार काही पैसे कमावण्याची संधी सुद्धा मिळेल. खरे तर ब्लॉग पार्ट टाईम मध्ये केलेत तरी त्या मार्फत आपल्यला मोबदला मिळतो केवळ एवढेच कि आपण सुरु केले आहात ब्लॉग तर दररोज लिखाण करा ब्लॉग वर दर्जेदार साहित्य लेख विचार मांडा भविष्यात आपण नक्कीच प्रसिद्दीचे शिखर गाठलं माझ्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत आणि काही मदत लागल्यास मी ( शुभम गोटे ) नक्कीच मदत करेल आपण मला संपर्क करू शकता माझ्या सोसिअल साईट्स वर.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top